Support
श्री बबनराव भेगडे
( संस्थापक )
Helping You Make Smart Financial Choices
आदरणीय खातेदार
वंदनीय ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने व आपल्या सहकार्याने ३१ वर्ष अविरत सेवा प्रदान करून श्री डोळसनाथ पतसंस्था यापुढे सेवा कार्याकरिता ठामपणे विश्वासाने पुढे जाणार आहे.
पतसंस्थेची ३१ वर्षाची यशस्वी वाटचाल होत असताना आपल्या सारख्या असंख्य हितचिंतकांच्या पतसंस्थेवरील विश्वास हा पतसंस्थाला गरुड भरारी घेऊन व्यवसायरूपी बळकटी देणार ठरला आहे.
आपल्या स्नेहरूपाने पतसंस्था चांगली व तत्पर सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहे.आपली अशीच साथ आम्हास लाभल्यास पतसंस्था यशाचे नवनवीन टप्पे पार करीत यशाचे शिखर गाठेल असा आम्हास पूर्ण विश्वास आहे .”सेवा परमोधर्म ” या प्रमाणेच या पुढील कार्य राहील याची ग्वाही देतो.
संस्थेच्या माध्यमातून राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमद्वारे संस्था नेहमीच आपल्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत असते सामाजिक बांधिलकी म्हणून डोळसनाथ परिवारातील प्रत्येक सभासदाच्या मदतीने संस्था हि कायम प्रगती पथावर राहील ……
ग्राहकांच्या सेवेशी सदैव तत्पर …….
श्री संतोष भेगडे
( आधारस्तंभ )
Helping You Make Smart Financial Choices
आदरणीय खातेदार
सातत्याने आपण आम्हास साथ दिलीत¸विश्वास ठेवला तो वृद्धिगत करीत असताना आधुनिकता¸टेक्नोलॉजीद्वारे पतसंस्था क्षेत्रात सर्वात जास्त डिजिटल व पेपरलेस बँकिंग कडे आमची नेहमीच वाटचाल राहील.तुमचा गुंतवणुकीला सुरक्षितता व योग्य परतावा देणे करिता तसेच कर्जदारांना सर्वोत्तम कर्ज योजना द्वारे आर्थिक पुरवठा करून सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्याकरिता आम्ही कटिबद्ध राहू.तसेच नवनवीन योजना राबवित सभासद व डोळसनाथ परिवारातील प्रत्येक घटकाचा प्रगती करीत नवीन उद्दिष्ट्ये व ध्येय प्राप्ती करीत राहू…..
पारदर्शक व आधुनिक सेवा देत …..
ग्राहकांच्या सेवेशी सदैव तत्पर …….